
Patpedhi sliders (10)

अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे सध्याचे संचालक मंडळ संस्थेचा प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंभ म्हणून सक्रियतेने कार्यरत आहे आणि ही सक्रीयता वेळोवेळी संस्थेच्या सातत्याने होणार्या प्रगतीमध्ये प्रतिबिंबित होत असते. संचालक मंडळाच्या नियमित बैठका घेतल्या जातात, ज्यामध्ये संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सतत सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक चर्चा केली जाते यावेळी संस्थेच्या सदस्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते.
संस्थेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक चांगले उपाय/ पर्याय शोधण्यासाठी, संचालक आणि कर्मचारी यांच्यात वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात.