कोविड पॉझिटिव्हआल्यानंतर मीआणि माझे कुटुंब (माझी पत्नी व माझ्या दोन मुली) एम्स हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालो होतो. कोरोनाची प्रचंडमोठी भीती मनामध्ये होती, पण इथे असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व इतर पॅरामेडिकल स्टाफ यांनी अतिशय चांगली ट्रीटमेंट केली. जो धीर, मानसिक आधार दिला त्यामुळे मनातील भीती दूर झाली. माझ्या पत्नीला ऑक्सिजन लावायची वेळ आली होती पण या बिकट परिस्थितित सुद्धा त्वरित उपचार उपलब्ध झाले आणि ती लवकरात लवकर बरी झाली. मी एम्स हॉस्पिटलमधील सर्व स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीत. कोरोनाच्या या परिस्तिथी मध्ये माणूस माणसाच्या जवळ जात नाही अशा वेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना मी स्वतः पाहिले आहे. खरं म्हणजे या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हॅट्सऑफ टू ऑल ऑफ देम.
मा.श्री.रविंद्र चव्हाण
(माजीराज्यमंत्री, आमदार- बीजेपी, डोंबिवली शहर)